
मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असतानाच आता पुन्हा एकदा हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील चार दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ सप्टेंबर रोजी नाशिक, अहिल्यानगर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.



