Bhagyashree Ganesh Aarti controversy: राजकुमाराऐवजी राजकन्या भाग्यश्रीने केली आरती, लाडकी लेक देखील मैदान, थेट फोटो.

गणेशोत्सवात सांगलीतील ऐतिहासिक श्री गणपती पंचायत संस्थानच्या आरतीचा वाद चव्हाट्यावर आला. पटवर्धन राजघराण्यातील हा मतभेद सांगलीसह संपूर्ण सिनेसृष्टीत चर्चेचा विषय ठरला आहे. तब्बल चार वर्षांनंतर श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांची कन्या आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन दासानी यांनी मंदिरात येऊन आरतीचा मान घेतला.
युवराज आदित्यराजे पटवर्धन उत्तराधिकारी असतानाही त्यांना डावलून भाग्यश्रींना हा मान मिळाल्याने वाद उफाळला.
या संपूर्ण प्रकरणात भाग्यश्री यांची लेक अवंतिका दासानी हिची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या नेटकऱ्यांच्या लक्षवेधक ठरली आहे. अवंतिकाने नुकतेच सांगलीच्या मंदिरातील काही खास फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. या फोटोंमध्ये भाग्यश्री आणि अवंतिका दोघीही श्री गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर दिवा लावताना दिसत आहेत. अवंतिकाने या प्रसंगी आकर्षक पिवळ्या रंगाची साडी नेसली होती, तर भाग्यश्री यांनी जांभळ्या रंगाची काठापदराची साडी परिधान केली होती. मंदिराच्या आवारात आई-मुलींची ही उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेत आहे.
अवंतिकाने शेअर केले फोटो
अवंतिकाने या फोटोंसोबत एक भावपूर्ण कॅप्शन दिले आहे, ‘बाप्पाचा हात अन् आईची साथ.’ ती पुढे म्हणते, “मी तिच्या बाजूला उभी आहे आणि नेहमीप्रमाणेच आजही ती मला शिकवत आहे. गणपती बाप्पा यांच्या (माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी) कृपाशीर्वादाने आम्ही प्रगतीपथावर नेहमी पुढे जात राहू. ठिकाण – सांगली.”
अवंतिकाने ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अवंतिका स्वतः अभिनेत्री आहे. तिने २०२२ मध्ये ‘मिथ्या’ या वेब सिरीजमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आईच्या पाठिंब्याचे दर्शन घडवणाऱ्या या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आई-मुलींचा हा एकत्रित क्षण आणि अवंतिकेचा आईच्या समर्थनार्थ केलेला हा भावपूर्ण संदेश सध्या सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.



