Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

अमेरिकेचा 100 टक्के टॅरिफ, इकडे हिंदी-चिनी भाई-भाई! भारतातून तब्बल 9.6 अब्ज डॉलर्सची चीनमध्ये निर्यात

भारताचे अमेरिकेसोबत असलेले व्यावसायिक संबंध सध्या तणावात आहेत. अशात भारताचे BRICS राष्ट्र समूहातील देशांसोबत असणारे व्यावसायिक संबंध आणखीन घट्ट होत आहेत. या राष्ट्र समूहातील इतर चार प्रमुख देश चीन, रशिया, ब्राजील आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये भारताची निर्यात वाढली आहे.

गेल्या पाच महिन्यांमध्ये BRICS प्रमुख राष्ट्रांसोबतच्या भारताच्या निर्यातीत 34 टक्क्यांची वाढ झाली आहे.

एप्रिल ते ऑगस्ट 2026 या पाच महिन्यांच्या काळात भारताने BRICS राष्ट्रांमध्ये सुमारे 19.9 अब्ज डॉलरची निर्यात केली होती. गेल्या वर्षीच्या याच काळातील हा आकडा 14.9 अब्ज डॉलर होता. एकंदरीत वर्षभरात निर्यातीत 5 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे.

BRICS समूहातील इतर राष्ट्रांच्या तुलनेने चीन भारताचा प्रमुख ग्राहक

BRICS राष्ट्र समूहातील चीन भारताचा प्रमुख ग्राहक आहे. एप्रिल-ऑगस्ट 2026-27 या काळात चीनला होणाऱ्या भारताच्या निर्यातीत सुमारे 39 टक्क्यांची वाढ जहजली आहे. गेल्या पाच महिन्यांत भारताने चीनला सुमारे 9.6 अब्ज कोटींची निर्यात केली आहे. महत्वाचे म्हणजे BRICS समूहातील सगळ्या प्रमुख राष्ट्रांना झालेल्या निर्यातीतील जवळपास अर्धा वाटा हा एकट्या चीनचा आहे.

भारताचा ग्राहक होण्याच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकाही सुसाट

दक्षिण आफ्रिका हा देश BRICS राष्ट्र समूहातील प्रमुख राष्ट्रांपैकी एक आहे. जिथे गेल्या पाच महिन्यांत चीनमध्ये भारताची निर्यात 39 टक्क्यांनी वाढली आहे तिथे दक्षिण आफ्रिकेने चक्क आभाळ गाठले आहे. गेल्या पाच महिन्यातील भारताच्या निर्यातीचा दर पाहता दक्षिण आफ्रिकेत भारताची निर्यात तब्बल 58 टक्क्यांनी वाढली आहे. हा वेग BRICS समूहातील इतर राष्ट्रांपेक्षा सर्वाधिक आहे.

BRICS समूहातील इतर राष्ट्रांचे गणित काय?

BRICS समूहातील चीन गेल्या पाच महिन्यांत 9.6 अब्ज कोटींच्या निर्यातीने भारताचा सगळ्यात मोठा ग्राहक राहिला आहे. तर दक्षिण आफ्रिकेत 58 टक्क्यांनी झालेली निर्यात वाढ समूहातील इतर राष्ट्रांच्या तुलनेने सर्वाधिक आहे. गेल्या पाच महिन्यांत ब्राजीलमध्ये होणाऱ्या भारताच्या निर्यातीत 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर रशियाला होणाऱ्या निर्यातीत 11 टक्क्यांची वाढ झाली आहे.

तरीही अमेरिका भारताचा सगळ्यात मोठा ग्राहक

BRICS राष्ट्र समूहातील देशांत भारताची निर्यात जरी वाढत असली तरी अमेरिका आजही भारताची सर्वात मोठी आणि पारंपरिक बाजारपेठ आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2026 -27 वर्षाचा आकडा पाहिला तर या काळात भारताने अमेरिकेत एकूण 42.79 अब्ज डॉलरची निर्यात केली आहे.

सध्या भारत आणि अमेरिकेत व्यावसायिक तणाव आहे. नुकतेच अमेरिकेने ‘लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट २०२६’ या कायद्याला मंजूरी दिली आहे. अशात भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो. त्यामुळे अमेरिका भारतावर 100 टक्के टॅरिफ लागू करण्याची शक्यता आहे. परंतु भारताने अमेरिकेला स्पष्टपणे सांगितले आहे की अशा निर्बंधांमुळे दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *