Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

अमेरिका-इराण युद्धाला पूर्णविराम मिळणार, चेंडू डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोर्टात, कोणत्या 3 अटींवर सर्व रखडलं?

इराण-अमेरिकेच्या युद्धाला लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. युद्ध संपुष्टात आणण्यासाठी तीन अटी ठेवण्यात आल्या आहेत. युद्धाला पूर्णविराम देण्याचा चेंडू हा अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोर्टात गेला आहे.

या गोष्टीला इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रसाई यांनी शनिवारी दुजोरा दिला आहे. अमेरिकेला कतार आणि पाकिस्तानमार्फत युद्ध संपवण्यासाठी तीन अटी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे अमेरिकेला लवकरच या अटींवर भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

युद्ध संपवण्यासाठी कोणत्या तीन अटी आहेत?

अमेरिकेला तीन मुख्य अटी पाठवण्यात आल्या आहेत. यात आघाड्यांवरील लष्करी संघर्ष, युद्ध पूर्णपणे थांबवणे, अमेरिकेने जप्त केलेली मालमत्ता परत कऱणे, इराणी बंदरावर लादण्यात आलेली सागरी नाकेबंदी उठवण्यात यावी, याचा समावेश आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमक पवित्र्यामुळे इराणला अण्वसस्त्र प्रसारबंदी करारातून माघार घेण्यासाठी आधार मिळत आहे. परंतु इराणकडून या करारातून बाहेर पडण्याचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय अमेरिकेच्या वर्तनावर अवलंबून असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

इराणच्या सुरक्षा प्रमुखांनी म्हटलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे इराणबाबतचे मूल्यांकन चुकीचे ठरले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी इशारा दिला की, ट्रम्प यांच्या धमक्यांचा काहीही परिणाम होणार नाही. इराण युद्धासाठी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. इराणच्या सशस्त्र दलांना अमेरिकेच्या लष्कराच्या कमकुवतपणाची जाणीव आहे. ते अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना सामोरे जाण्यास तयार आहे. अमेरिकेने मागील करारातून माघार घेतल्याने तेहरानला वॉशिंग्टनबाबतची रणनिती बदलावी लागली. इराणने अलीकडेच अमेरिकेच्या जहाजाजवळ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून तयारी दाखवली आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. तत्पूर्वी, येमन आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंधावर रजाई यांनी महत्त्वाचं भाष्य केलं. रजाई म्हणाले, सौदी अरेबिया आणि येमेन यांच्यातील सुरू असलेला संघर्ष संपुष्टात यावा, अशी इराणची इच्छा आहे. येमेनचे लोक देखील सौदी अरेबियाच्या कराराच्या बाजूने आहेत, असा इराणला विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *