Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर… ‘लालबागचा राजा’च्या चरणी भरभरुन दान, ३ दिवसांत कोट्यवधींची देणगी; आकडा पाहून व्हाल थक्क!

मुंबई : राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असून मुंबईत प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी अनेक जिल्ह्यातून लोक येत आहेत. सर्वसामान्यांसह दिग्गज कलाकार, राजकारणी आणि बडे उद्योगपती देखील राजाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.

त्यामुळे दिवस-रात्र लालबाग परळ परिसरात भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला भाविक मोठी गर्दी करत असून गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत या गणेश मंडळाला कोट्यवधी रुपयांची देणगी मिळाली आहे. रोख रक्कम, सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या स्वरूपात ३.१८ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. यामध्ये १.९ कोटी रुपये रोख मिळाले असून, ९८.९ लाख रुपये किमतीचे ६४७.४७ ग्रॅम सोने आणि ३०.३५ लाख रुपये किमतीची १२,३८९ ग्रॅम चांदी मिळाली आहे.

या देणगीचे एकूण किंमत ३.१८ कोटी रुपये इतके आहे. लालबागच्या राजाला मिळालेल्या सोने-चांदीच्या वस्तूंमध्ये सोन्याच्या बांगड्या, साखळ्या, चांदीचे पेन, चांदीवर नक्षीकाम केलेली क्रिकेट बॅट आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.

पहिल्याच दिवशी ४८.५ लाख रुपये रोख

लालबागचा राजा सार्वजनिक गणेश पहिल्या दिवशी मंडळाला ४८.५ लाख रुपये रोख, ६६.७७ ग्रॅम सोने आणि २८०६ ग्रॅम चांदी मिळाली. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी,८८.९ लाख रुपये रोख, २२६.१२ ग्रॅम सोने आणि ५,५१६ ग्रॅम चांदी मिळाली असून १७ सप्टेंबर रोजी मंडळाला ५३ लाख रुपये रोख, ३५४.५८ ग्रॅम सोने आणि ४,०६७ ग्रॅम चांदी प्राप्त झाली.

“बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी आणि ‘लालबागचा राजा’ ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य यांचा समावेश असलेली एक टीम देणगीतील रकमेची व वस्तूंची मोजणी आणि तपासणी करत आहे. देणगीत जमा झालेली रक्कम बँकेत पाठवली जाणार आहे. तसेच संस्थेद्वारे वर्षभर केल्या जाणाऱ्या विविध समाजोपयोगी व धर्मादाय कार्यांसाठी तिचा वापर केला जाईल,” अशी माहिती ट्रस्टच्या एका सदस्याने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *