Navgan News



Add Space

धार्मिकनवगण विश्लेषणमहाराष्ट्रराष्ट्रीय

यंदा ३०० वर्षांनंतर १२ दुर्मिळ योग आणि ४ राजयोगांचा महासंयोग; महाशिवरात्रीला या राशींचं नशीब उजळणार!..

Mahashivratri : ज्योतिषशास्त्रानुसार रविवार १५ फ्रेब्रुवारी २०२६ रोजी साजरी होणारी महाशिवरात्रीला एक मोठा खगोलीय घटना घडणार आहे. या पवित्र दिवशी ग्रहांची अशी दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे, जी मागील ३०० वर्षात पाहायला मिळाली नव्हती.

या दिवशी एकाच वेळी चार मोठे राजयोग आणि १२ शुभ योगांचा अद्भुत संयोग घडत आहे. कुंभ राशीत सूर्य, बुध, शुक्र आणि राहू यांच्या उपस्थितीमुळे “चतुर्ग्रह योग’ तयार होईल, जो ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा अनेक पटींनी वाढवेल. याचा सर्वाधिक शुभ परिणाम मेष, सिंह आणि मकर राशीच्या व्यक्तींवर होणार आहे.

 

एकाच वेळी सक्रिय होणार १२ शुभ आणि ४ राजयोग

या महाशिवरात्रीची सर्वात मोठी खासियत म्हणजे या दिवशी निर्माण होणाऱ्या योगांची मोठी यादी. या दिवशी प्रीती, आयुष्मान, सौभाग्य, साध्य, शिव, शुक्ल, शोभन, सर्वार्थसिद्धी, चंद्रमंगल, त्रिग्रही, राज आणि ध्रुव असे १२ शुभ योग एकाच वेळी सक्रिय राहतील. या योगांसोबतच सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे बुधादित्य, लक्ष्मी नारायण आणि शुक्रादित्य असे ४ मोठे राजयोगही तयार होत आहेत. हे सर्व योग एकत्र येऊन अशी शक्ती निर्माण करतील, जी थेट व्यक्तीची बुद्धिमत्ता, सुखसोयी आणि समाजातील प्रतिष्ठा वाढवण्याचे काम करेल.

 

मेष

ग्रहांच्या या महासंयोगाचा पहिला आणि मोठा परिणाम मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनात दिसून येईल. या व्यक्तींसाठी करिअरच्या दृष्टीने एक नवा आणि शानदार काळ सुरू होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभाच्या उत्तम संधी मिळतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत आणि स्थिर होईल.

 

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही ही महाशिवरात्री आनंदाची बातमी घेऊन येईल. या राशीचा स्वामी सूर्य स्वतः राजयोगाचा भाग असल्याने समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव आणि मान-सन्मान वाढेल. सरकारी कार्यालये किंवा कायदेशीर कागदपत्रांमुळे अडकलेली कामे आता महादेवांच्या कृपेने सुरळीत पूर्ण होतील. त्यामुळे आत्मविश्वासातही मोठी वाढ होईल.

 

मकर

या शिवकृपेचा थेट लाभ मकर राशीच्या व्यक्तींना होईल. नवीन मालमत्ता खरेदी किंवा गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरेल. घर, जमीन-जुमला किंवा इतर गुंतवणुकीत मोठा फायदा होण्याचे संकेत आहेत. यासोबतच कुटुंबातील जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि समन्वय वाढेल, ज्यामुळे मानसिक समाधान आणि शांतता लाभेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *