भारताचा मित्र देश, जिथे 1 रुपयाची किंमत 500 रुपये; हजार रुपयांमध्ये आरामात दहा दिवसांची ट्रिप …

हा देश भारताला आपला मित्र मानतो, मात्र अमेरिकेला शत्रू राष्ट्र समजतो. हा देश खूप सुंदर आहे. या देशाला प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे. या देशात एक मोठी संस्कृती उदयाला आली, तिचा विकास झाला.
हा देश पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, दरवर्षी लाखो लोक या देशात पर्यटनाला जात असतात. मात्र या देशात सध्या माहागाईचा अगडोंब उसळला असून, तीथे भारताच्या एका रुपयाची किंमत तब्बल 500 रुपये इतकी आहे. तुमच्याकडे जर एक हजार भारतीय रुपये असतील तर तुम्ही या देशात दहा दिवसांची ट्रिप आरामात करू शकतात.
हा देश भारताला आपला मित्र मानतो. भारत आणि या देशाचा खूप जुना संबंध आहे. जगात जेवढे तेल उत्पादक देश आहेत. त्यातील प्रमुख देशामध्ये याचा समावेश होतो. मात्र अमेरिकेसोबत असलेल्या शत्रूत्वामुळे सध्या हा देश कठीण परिस्थितीमधून जात आहे. महागाई एवढी वाढली आहे की तिथे भारताच्या एका रुपयाची किंमत पाचशे रुपये एवढी आहे. जाणून घेऊयात या देशाबद्दल
आपण ही चर्चा इराणबाबत करत आहोत. येथील चलन हे ईरानियन रियाल आहे.सध्या या इरानियन रियालचे दर एवढे घसरले आहेत की तिथे भारताचा एक रुपया तब्बल 481 इरानियन रियाल एवढा आहे. एक काळ असा होता की रियालची किंमत ही डॉलरच्या तुलनेत चांगली होती. मात्र गेल्या काही काळापासून हा देश महागाईच्या संकटाचा सामना करत असून, रियाल एवढा घसरला आहे की, तिथे एक रुपयांच्या बदल्यात 481 रुपये मिळतात. या देशाचं अमेरिकेसोबत शत्रूत्व आहे. त्यामुळे अमेरिकेकडून इराणवर अनेक आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.
एक रुपयाची किंमत किती?
इराणमध्ये भारताच्या एका रुपयांची किंमत तब्बल 481 इरानियन रियाल एवढी आहे. म्हणजे जवळपास पाचशे रुपयांच्या घरात ही किंमत आहे. त्यामुळे तुम्ही जर हजार रुपये घेऊन इराणला गेलात तर तुमच्या दहा दिवसांची ट्रीप सहज शक्य आहे. ते पण तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये वास्तव्य करून ट्रिपचा आनंद घेऊ शकता.