
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के सुरू आहेत. आता आणखी एक मोठा धक्का नाशिकमध्ये बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी आणि उपनेते विजय करंजकर यांची देखील उपस्थिती होती. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचे संकेत मिळत आहेत, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी ठाकरे गटाच्या नाशिक जिल्ह्यातल्या निफाड आणि दिंडोरीमधील अंदाजे दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. हा ठाकरे गटासाठी नाशिकमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची ताकत आता आणखी वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. तर महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला होता. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. महायुतीच्या राज्यात 232 जागा निवडून आल्या मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचे तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या. 132 जागा जिंकत भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेनेला देखील निवडणुकीत चांगलं यश मिळालं. या निवडणुकीनंतर आता ठाकरे गटातील अनेक नेते पदाधिकारी हे शिवसेनेते प्रवेश करताना दिसत आहेत. याचा मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला आगामी निवडणुकांमध्ये बसू शकतो.