Navgan News

ताज्या बातम्या

Video : दैव बलवत्तर ! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं


एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक चिमुकला खिडकीच्या छतावरुन कोसळणार होता. परंतु परिसरातल्या रहिवाशांनी त्याला अलगद वाचवलं आहे. चेन्नईतल्या आवडी येथील एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे.

 

खिडकीच्या छतावर एक लहान मूल घसरुन पडले होते. परंतु त्याला वाचवण्यासाठी लोकांनी खाली कपडा धरला.

काही लोकांनी खालच्या खिडकीतून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. शेवटी मोठ्या प्रयत्नानंतर चिमुकल्याला खाली घेतलं आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. ‘इंडिया टूडे’ने हा व्हिडीओ शेअर केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *