
बीजिंग : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरून गेले होते. या कोरोनामुळे जगभरात कोट्यावधी लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागेल. या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करावे लागले होते.
यामुळे संपुर्ण जगाची आर्थिक व्यवस्था ढासळली होती. आजही कोरोना काळ आठवला तर लोकांच्या अंगावर शहारा येतो. संपूर्ण जग कोरोनातून हळूहळू सावरत असतानाच आता चीनमध्ये रहस्यमयी न्यूमोनियाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
⚠️UNDIAGNOSED PNEUMONIA OUTBREAK—An emerging large outbreak of pneumonia in China, with pediatric hospitals in Beijing, Liaoning overwhelmed with sick children, & many schools suspended. Beijing Children's Hospital overflowing. 🧵on what we know so far:pic.twitter.com/hmgsQO4NEZ
— Eric Feigl-Ding (@DrEricDing) November 22, 2023
या रहस्यमयी न्यूमोनियाच्या लागण झालेल्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे अनेक शाळा बंद करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर चीनमधील सध्याच्या परिस्थितीवर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त करत लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या रहस्यमयी न्यूमोनिया लहान मुलेंना लाग होऊन ते आजारी पडत असल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण चीनमध्ये दिसत असून चीनच्या रुग्णालयात मोठी गर्दी पहाला मिळाली आहे.
रहस्यमयी न्यूमोनियासंदर्भात महामारीतज्ज्ञ एरिक फिगल डिंग म्हणाले, “बीजिंगमधील बाल रुग्णालयातील बेड्स भरले असून यामुळे शहरांतील शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या रहस्यमयी न्यूमोनियांच्या आजारावर औषध उपचार सापडलेले नाही. यामुळे चीनमध्ये चिंतेचे वातावरण ला मिळत आहे. उत्तर चीन, बीजिंग आणि लियाओनिंगच्या रुग्णालयात आचाराची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्या सर्वाधिक आहेत. तर यात लहान मुले आहे, या मुलांना रहस्यमयी न्यूमोनियामुळे फुफ्फुसांमध्ये तीव्र वेदना होऊ लागतात आणि ताप येतो.