Video :चक्क अवाढव्य हत्तीशी पंगा घेतला. हत्तीशी शेपटी त्याने खेचली. त्यानंतर त्याच्यासोबत घडलं ते भयंकर

रस्त्याने चालता चालता मुक्या जीवांना त्रास देणारे कितीतरी लोक आहेत. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
या व्यक्तीने साध्यासुध्या नव्हे तर चक्क अवाढव्य हत्तीशी पंगा घेतला. हत्तीशी शेपटी त्याने खेचली. त्यानंतर त्याच्यासोबत घडलं ते भयंकर आहे.
The culprit has been arrested. He is Mr Dilip Sahoo.Retweet to shame him as much as possible so that he dare not repeat this again 🙏 https://t.co/TvBENdTqzL pic.twitter.com/WrotmKqiML
— Susanta Nanda (@susantananda3) November 7, 2023
लहान मुलांना मांजराची, कुत्र्याची शेपटी खेचताना पाहिलं असेल. त्यांना एक वेळ समजत नाही पण कित्येक मोठी माणसंही जाणूनबुजून आपल्या मजेसाठी असं करतात. यामुळे प्राणी चवताळतात आणि चावतात. पण या प्राण्याच्या जागी अवाढव्य हत्ती असेल तर काय होईल? फक्त विचार करूनच तुमच्या अंगावर काटा आला असेल. एका व्यक्तीने हे केलं त्याचा असा परिणाम झाला की व्यक्ती आयुष्यात विसरणार नाही.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक हत्ती पाठमोरा दिसतो आहे. त्याच्या आजूबाजूला काही लोक आहे. एक व्यक्ती त्या हत्तीच्या पाठीमागेच आहे. अवाढव्य हत्तीची छोटीशी शेपटी पाहून त्याला मजा वाटू लागली. त्याने ती खेचली. त्यानंतर हत्ती चवताळला आणि मागे फिरला. त्या व्यक्तीच्या मागे तो धावत सुटला. तिथं असलेले इतर लोकही आपला जीव वाचवण्यासाठी धावू लागले.
वन अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “हे सहन करून घेतलं जाणार नाही. एकतर हत्ती तुम्हाला चिरडून टाकेल किंवा आमचा कायदा.”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ओडिशाच्या अंगुलमधील आहे. 5 नोव्हेंबर रोजी घडलेली ही घटना. दिलीप साहू असं या व्यक्तीचं नाव, त्याला अटक करण्यात आली आहे.