WHO च्या मते, आपण दररोज ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त होते, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. ‘डब्ल्यूएचओ’च्या मते, लोक दररोज ९ ते १२ ग्रॅम मीठ खातात, जे आरोग्यास हानी पोहोचवते. रक्तदाब वाढू शकतो
जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. रक्तदाबामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. उच्च रक्तदाबामुळे दृष्टी कमी होऊ शकते. जेवणात मर्यादित मीठ सेवन केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते, जेवणाची चव सुंदर राहते, तसेच अनेक आजारांचा धोका कमी होतो. लठ्ठपणा वाढतो
जेवणात जास्त मीठ घेतल्याने लठ्ठपणा वाढतो. मिठाच्या अतिसेवनाने शरीरातील कॅलरीज वाढतात, ज्यामुळे शरीरातील चरबी वाढते. मिठाचे जास्त सेवन केल्याने देखील गॅस्ट्रिक ट्यूमर होऊ शकतो. लठ्ठपणा वाढत असेल तर मीठावर नियंत्रण ठेवा.किडनीच्या आरोग्यावर परिणाम
जास्त मीठ खाल्ल्याने किडनीच्या आरोग्यावरही परिणाम होतो. जेव्हा जास्त सोडियम शरीरात जाते, तेव्हा मूत्रपिंडाला ते पचवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. फुगलेला चेहरा
जास्त मीठ खाल्ल्याने चेहऱ्यावर सूज येऊ लागते. अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की मिठाच्या अतिसेवनाने चेहरा फुगलेला दिसतो. हात-पायांची सूज वाढू शकते: मिठाच्या अतिवापराने हात-पायांवर सूज येऊ शकते.