
अंजीर आरोग्यासाठी अत्यंत चांगले ठरतात. अंजीरमध्ये मँगनीज, जिंक, मॅग्नेशियम, लोह अशी खनिजे मिळतात. अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायबरही अधिक प्रमाणात असते. अंजीराचे सेवन केल्यामुळे महिलांना हार्मोनल समस्या आणि मासिक पाळीच्या त्रासामध्येही फायदा मिळतो. भिजवलेले अंजीर खाल्ल्याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. खरं तर भिजवलेले अंजीर उपाशीपोटी सकाळी उठून खाल्ले तर जास्त वेळ पोट भरलेले राहाते. तसंच मधुमेहाच्या रूग्णांसाठीही याचा फायदा होतो. जाणून घ्या अधिक फायदे:- हृदयाची काळजी घेण्यासाठी:-अंजीरात असणारे अँटीऑक्सिडंट हे तुमच्या शरीरातील रक्तदाबाला नियंत्रणआत आणण्यासाठी मदत करते. याशिवाय हृदय निरोगी राखण्यासाठीही याची मदत मिळते. अंजीर हे शरीरातील हृदयासंबंधित समस्यांचे प्रमुख कारण असणाऱ्या ट्रायग्लिसराईड्सची पातळी कमी करून आरोग्य चांगले राखण्यास फायदेशीर ठरते. हाडांना मजबूती देते:-अंजीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम असे गुण आढळतात, जे हाडांची मजबूती टिकवून ठेवण्यास मदत करतात. तसंच हे सर्व पोषक तत्व हाडांच्या तंदुरूस्तासाठी फायदेशीर ठरतात.प्रजननक्षमता वाढविण्यासाठी फायदेशीर :-अंजीरमध्ये अनेक खनिजे असतात, जे प्रजनन निरोगी ठेवण्यास मदत करते. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि फायबर हे हार्मोन असंतुलन आणि मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी करण्यास फायदा करून देते. तसंच महिलांना ज्यावेळी थकवा येतो तेव्हा अंजीर खाण्याचा सल्ला देण्यात येतो.