
गाजर अनेक रोगांसाठी एक चांगले औषध आहे. गाजर खाल्ल्याने डोळ्यांचा प्रकाश वाढतो यामुळे दृष्टी वाढवण्यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु गाजराचा फायदा केवळ डोळ्यांनाच होतो असे नाही, त्याचे अनेक मोठे फायदे आहेत.गाजर अनेक रोगांसाठी एक चांगले औषध आहे. गाजर खाल्ल्याने डोळ्यांचा प्रकाश वाढतो यामुळे दृष्टी वाढवण्यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु गाजराचा फायदा केवळ डोळ्यांनाच होतो असे नाही, त्याचे अनेक मोठे फायदे आहेत. गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी असतात. हे काविळचे नैसर्गिक औषध आहे. याचे सेवन ल्यूकेमिया आणि पोटाच्या कँसरसाठी देखील फायदेशीर आहे. गाजर हे हिवाळ्यातील कंदमूळ आहे. यामुळे हिवाळ्यात गाजराचे सेवन नियमित केल्याने शरिलाला त्यांचा चांगला फायदा होतो. गाजरामध्ये बीटा कॅरेटीनचं प्रमाण अधिक असतं. अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर हिवळ्यात सेवन केल्यास त्यातून अनेक पोषक तत्वे मिळतात. तुम्ही गाजराची कोशिंबीर, हलवा, वड्या बनवून सेवन करू शकता. शिवाय दररोज कच्च गाजर खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते. रोज एक गाजर खाल्ल्यानं हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. गाजर खाण्याचे फायदे :-
गाजराचा ज्यूस शरीरातील व्हिटॅमिन ए आणि ई ची कमतरता दूर करतो. याची शरीरात कमतरता असेल तर त्वचेत कोरडेपणा, केस तुटणे, नखे खराब होणे अशा समस्या उद्भवतात. व्हिटॅमिन ए आपल्या शरीराचे हाड आणि दातांसाठी आवश्यक असते. तसेच गाजराचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी मजबूत होते. यासोबतच त्वचा आणि केस निरोगी आणि चमकदार बनतात.
गाजरात मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. गाजर चावून चावून खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. यामुळे बध्दकोष्ठ आणि गॅस सारख्या समस्या दूर होतात. गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने त्वचा तजेलदार बनते.
गाजर कच्च खाल्यास अधिक फायदा होतो. गाजराचे सेवन केल्याने पचन क्रिया सुधारते तसेच गाजरात असलेल्या बिटा कॅरेटिन मुळे कॅन्सरसारख्या आजाराला प्रतिबंध घालण्यास मदत होते.
थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात उब राहते. गाजरामुळे वजन वाढत नाही त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर बिनधास्त खाऊ शकता. गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोह अधिक असतं. त्यामुळे त्याचे सेवन केल्यास अॅनिमियासारखा आजार दूर होतो. गाजरांच्या पानांची भाजी देखील तयार केली जाते.
थंडीत गाजर खाल्ल्यास शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो. पालक आणि गाजराचा रस एकत्र करून प्यावा यामुळे तब्येत सुधारते. गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, ए आढळते. यामुळे हृदयरोगावरही मात करता येते.