खीरा किंवा काकडी एक असा खाद्य पदार्थ आहे जो पुर्ण भारतात सहज मिळतो. काकडी शरीराला शीतलता आणि ताजेपणा प्रदान करते. याला तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. जेसे सलाड, सँडवीच, किंवा तिखट मिठ लावुन खाऊ शकता. काकडीचे स्वास्थवर्धक आणि सौंदर्यवर्धक गुण दोन्ही अगणित आहेत.
1. शरीराला जलमिश्रीत ठेवण्यास मदत
काकडीमध्ये 95 टक्के पाणी असते. यामुळे हे शरीरातील विषारी आणि अनुपयोगी पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करते, आणि शरीराला जलमिश्रीत ठेवते.
2. त्वचा उजळ
काकडी एक असा पदार्थ आहे जो त्वचेला विविध प्रकारच्या समस्यापासुन दूर ठेवण्यात मदर करते. जसे की, टॅनिंग, सनबर्न, रॅशेज आदि. रोज काकडी खाल्याने रुक्ष त्वचेत ओलावा पुन्हा येतो. यामुळे हे नॅचरल मॉश्चरायजरचे काम करते. हे त्वचेतील तेल काढण्याची प्रक्रिया कमी करुन पिंपल्स येणे कमी करते.
3. हँगओवर कमी करण्यात मदत
दारु प्यायल्याने अनेक दुष्परिणाम होतात. यामुळे दुस-या दिवशी हँगओवरचा सामना करावा लागतो. यापासुन वाचण्यासाठी तुम्ही रात्री काकडी खाऊन झोपा, कारण काकडीमध्ये व्हिटॅमिन बी, शुगर आणि इलेक्ट्रोलाइट असतात जे हँगओवर कमी करण्यास खुप मदत करता.