हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला प्रत्येक डॉक्टर देतात. हिरव्या भाज्यात सर्व प्रकारचे पोषक तत्व आढळतात, हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक स्वादासोबत च आरोग्यासाठीही उपयुक्त असते. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. तसे पाहता आजकाल बाराही महिने सर्व भाज्या मिळतात. परंतु पावसाळ्यात येणाऱ्या पालक मध्ये माती व किटाणू असतात. म्हणून या वेळी पालक खायला नको.
पालक खाण्याचे फायदे
1) वजन कमी करण्यासाठी
जर तुम्हीही वाढत्या वाजनापासून चिंताग्रस्त असाल तर. पालक चे सेवन तुमचे वजन कमी करण्यात उपयुक्त ठरू शकते. पालक मध्ये वजन कमी करणारे गुण असतात. पालक कमी कॅलरी वाली भाजी आहे, जीला आहारात समाविष्ट केल्याने वजन नियंत्रणात राहते.
) कॅन्सरच्या रोगामध्ये उपयुक्त
पालक चे सेवन कॅन्सर सारख्या रोगालाही दूर करते. पालक मध्ये बीटा कॅरोटीन आणि विटामिन सी असते. हे दोघे पोषकतत्व शरीरात विकसित होत असलेल्या कॅन्सर च्या पेशींना नष्ट करतात.
3) डोळ्यांच्या समस्येत उपयोगी
डोळ्यांच्या समस्या पासून दूर राहण्यासाठी पालक चे सेवन उपयोगी आहे. डॉक्टर देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. पालक डोळ्यांमध्ये होणारे मॅक्युलार डीजनरेशन या नेत्र रोगाला नियंत्रित करते.
4) हाडाच्या आरोग्यासाठी
हाडाच्या आरोग्यासाठी पालक खाणे खूप उपयुक्त आहे. पालक हाडकांच्या निर्माणापासून तर त्यांच्या विकासापर्यंत मदत करते आणि हाडांना मजबुती प्रदान करते. पालक मध्ये कॅल्शिअम आढळतात. जे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त असते.
5) मेंदूच्या स्वास्थ्यासाठी पालक उपयुक्त
ज्याप्रमाणे वर सांगितले की पालक मध्ये कॅल्शिअम चे प्रमाण आढळते. कॅल्शिअम मुळे मेंदूला चालना मिळते व स्मरण शक्ती वाढते.
6) हृदय विकारात उपयोगी
हार्ट अटॅक चा धोका दूर करण्यासाठी पालक चे सेवन प्रभावी ठरते. पालक स्ट्रोक आणि हार्ट अटॅक मुळे होणाऱ्या मृत्यूचे जोखीम कमी करते.
7) ब्लड प्रेशर नियंत्रित करते
पालक मध्ये नायट्रेटचे प्रमाण असते. नायट्रेट युक्त पालक ब्लडप्रेशर कमी करण्यात लाभदायक ठरते. सोबतच ही हृदयाला रक्तपुरवठा करण्यात मदत करते.
8) ॲनिमिया चा धोका कमी करते
शरीरात लाल रक्तपेशी ची कमी म्हणजेच ॲनिमिया चा सर्वात जास्त धोका गर्भावस्थेत असतो. आयरन च्या कमतरतेमुळे ही स्थिती उत्पन्न होते. पालक मध्ये आयरन ची मात्रा भरपूर प्रमाणात असते. म्हणून पालक खाल्ल्याने ॲनिमियाचा धोका टाळता येतो.
9) पचन व्यवस्थित करते
पालक फायबर आणि पाण्याने भरलेले असते. फायबर पचन तंत्र व्यवस्थित कार्यरत ठेवते. पालक खाल्ल्याने अपचन, गॅसेस यासारख्या समस्या दूर होतात. पालक पोटाच्या कॅन्सर पासूनही वाचवते.