किरकोळ कारणातून दोन गटात झालेल्या हाणामारीत बापलेक जखमी झाले आहे.
सिडकोतील उत्तमनगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी विनयभंगासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तमनगर भागातील शिवपुरी चौकात राहणा-या पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित महिपत पुंजाजी वाणी व सचिन महिपत वाणी (रा.दोघे उत्तमनगर सिडको) या बापलेकाने रविवारी (दि.१६) रात्री लहान मुलांच्या भांडणाची कुरापत काढून महिलेस अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत अश्लिल शिवीगाळ करीत विनयभंग केला. तर महिपत वाणी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रवी शिंदे, रितेश दोंडगे, गौरव देसले, संजय साबळे, शुभम साबळे, अनिकेत आहेर (रा.सर्व शिवपुरी चौक,सिडको) आदींनी रविवारी मुलगा पेट्रोल चोरतो या कारणातून वाद घालत बापलेकास जातीवाचक शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.
या घटनेत बापलेक जखमी झाले असून याप्रकरणी परस्परविरोधी विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियम व बाल अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अनुक्रमे उपनिरीक्षक जाधव व शेख करीत आहेत.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.