
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आली आहे. त्यांना उडवून टाकण्याची धमकी देणार फोन मुंबई पोलिसांना आला आहे. यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांनी लागलीच फोन कोठून आला, त्याचा शोध घेतला. त्यावेळी हा फोन पुणे शहरातून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात धमक्यांचं सत्र सुरुच आहे. भाजपचे नेते (BJP) नितीन गडकरी यांना कारागृहातून धमकीचा फोन आला होता.
त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही धमकीचा फोन आला होता.