Navgan News

ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणाचे 34.77 कोटी वितरित


राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, या योजनांमधून पुणे जिल्ह्यात 2022-23 मध्ये सुमारे 34 कोटी 77 लाख 33 हजार रुपयांइतक्या अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली.

कृषी अवजारांच्या खरेदीसाठी एकूण 6 हजार 134 लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहेत.

कृषी विभागाच्या योजनांची पोर्टलद्वारे अंमलबजावणी केली जात असून, शेतकर्‍यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. संबंधित योजनांतर्गत पात्र शेतकर्‍यांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड केली जाते. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलरचलित अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैलचलित अवजारे, प्रक्रिया युनिट्स, भाडेतत्त्वावर कृषी व अवजारे सेवा पुरवठा केंद्रांची उभारणी (सीएचसी) अवजारे बँक आदी अनुदानासाठी समाविष्ट आहेत.

तालुकानिहाय लाभार्थी शेतकरी संख्या व वर्ग केलेले
अनुदान रुपयांमध्ये पुढीलप्रमाणे ः
आंबेगाव ः 494 लाभार्थी शेतकरी – 2 कोटी 71 लाख 36 हजार
बारामती ः 821 – 4 कोटी 67 लाख 78 हजार
भोर ः 345 – 2 कोटी 40 लाख 20 हजार
दौंड ः 799 – 4 कोटी 10 लाख 19 हजार
हवेली ः 239 – 1 कोटी 25 लाख 63 हजार
इंदापूर ः 782 – 4 कोटी 70 लाख 48 हजार
जुन्नर ः 522 – 3 कोटी 3 लाख 11 हजार
खेड ः 394 – 2 कोटी 33 लाख 5 हजार
मावळ ः 61 – 59 लाख 69 हजार रुपये
मुळशी ः 89 – 95 लाख 38 हजार
पुरंदर ः 612 -2 कोटी 64 लाख 63 हजार
शिरूर ः 888 – 4 कोटी 87 लाख 70 हजार
वेल्हे ः 88 लाभार्थी शेतकरी – 48 लाख 6 हजार


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *