ताज्या बातम्या

हॉटेलच्या रुममध्ये जुळ्या मुलींसहित एकाच कुटुंबातील चौघांचे आढळले मृतदेह


जुळ्या मुलींसह पती-पत्नीचे मृतदेह हॉटेलच्या रूममध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना कर्नाटकात मंगळुरू येथील एका लॉजमध्ये उघडकीस आली आहे. आर्थिक त्रासाला कंटाळून कुटुंबाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पती देवेंद्र, पत्नी निर्मला, ९ वर्षीय जुळ्या मुली चैत्रा आणि चैतन्या अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मैसूर येथील आहे. २७ मार्चला या कुटुंबाने हॉटेलमध्ये भाड्याने रुम घेतली होती. ३० मार्चला या कुटुंबाचे हॉटेलमधून चेकआऊट होणार होते परंतु कुणीच बाहेर न आल्याने हॉटेल कर्मचाऱ्याने दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता चौघांचे मृतदेह आढळून आले.

देवेंद्रचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला तर पत्नी, जुळ्या मुलींचा मृतदेह बेडवर पडला होता. देवेंद्रने त्याच्या मुलींना विष पाजून मारले त्यानंतर पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि स्वत:नेही गळफास घेतला असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी तपास केला असता सुसाईड नोटही आढळली त्यात आर्थिक संकटात अडकल्यामुळे हे टोकाचं पाऊल उचललं असं म्हटलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *