
भारत आणि चीनचा ‘ सार्वभौम जागतिक शक्ती केंद्रे’ म्हणून गौरव करून या देशांबरोबर संबंध अधिक दृढ करण्याबरोबर समन्वय वाढविण्याचा मनोदय रशियाने व्यक्त केला. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंजूर केलेल्या परराष्ट्र धोरणाच्या नवीन संकल्पनेची सुरुवात करताना मॉस्कोने सांगितले की, रशिया भारताबरोबर राजकीय आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.
या नव्या धोरणानुसार रशिया मित्र देश नसलेल्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या धोकादायक कारवाया रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान, मास्कोने युक्रेवर आक्रमण केल्यानंतरही भारत आणि रशिया यांच्यातील संबंध मजबूत आहेत.