
उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे महीला दिवस आणि सप्ताह उत्साहात साजरा
दिनांक ४ मार्च ते १० मार्च पर्यंत या सप्ताहात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून महीला सप्ताह साजरा करण्यात आला.दिनांक ४ तारखेला महीला सप्ताहाचे उद्घाटन सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांनी केले आणि सप्ताहाभर/आठवडाभर कायकाय कार्यक्रम होणार याची माहिती दिली.आणी महीला सप्ताहाचे उद्देश समजावून सांगितले.दिनांक ५ ला महीलांना बाळाच्या लशीकरण, आणि आरोग्य व आहार याचा कार्यक्रम घेण्यात आला त्यात सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी मार्गदर्शन केले लसिकरणाची माहीती सौ ढोले, आहाराविषयी सौ ढोक , बाळांचे आरोग्य,सौ जूनघरे ,सौ रामटेके यांनी मार्गदर्शन केले.दिनांक ६ ला महीलांना आरोग्य योजनेची, सेवा यांची माहिती सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी दिली.दिनांक ७ ला रुग्णालयात भरती असलेल्या महीला मार्गदर्शन केले.दिनांक ८ ला सर्व महिलांना स्वतः च्या तपासणी चे महत्व आणि फायदे सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी आणी सौ किरण धांडे यांनी कागदपत्रांची माहिती दिली.दिंनांक ९ ला वयोवृद्ध महिला यांनी काय काळजी घ्यावी तसेच सून सासू हे संबंध मधून ठेवून सासूला सूनेंने आई प्रमाणे वागणुक द्यावी व सासुने सूनेला मूलिप्रमाणे वागवावे.भांडनतंटा दुर ठेवून गूण्यागोविंदाने सर्वांनी राहावे असे आवाहन सौ वंदना विनोद बरडे यांनी केले तसेच अवयव दान ,देहदान ,नेत्रदान, रक्तदान याची माहिती देवून जनजागृती प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले.दिनांक १० ला कार्यक्रम खूप रंगात होता सर्व अधिकारी कर्मचारी अगदी आनंदी होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन सौ डॉ राठोड वैद्यकीय अधीकारी यांनी केले.मा जिजाऊ,राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले,फ्लारेंन्स नाईटिंगेल, इंदिरा गांधी,लता मंगेशकर, सिंधूताई सपकाळ, यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व महिलांना या व्यक्ती विषयी सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांनी पूजन सर्व महीला च्या हाताने केले सकाळी ९ ला कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या गुलाब फुलाने सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले.फूगे फुगवून त्याचा बंच करून सर्व महिलांच्या हाताने आकाशात सोडण्यात आला.आणी एकतेचा संदेश देवून उंच भरारी घेण्यासाठी शूभेच्छा देण्यात आल्या.ही संकल्पना सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांची होती.तसेच महीलांनी आपल्या पुरते मर्यादित न राहता कुटूंब, समाज,जनता यांच्या केंद्रस्थानी आपण आहोत आणि आपल्याला त्यांची काळजी घ्यायची आहे.याचे महत्व विषद केले.मस्त जेवणाचा आनंद घेवून नवीन भरारी, नवीन ऊम्मीद घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सूत्रसंचालन सौ राईसपायले, आभारप्रदर्शन सौ खान व कार्यक्रमासाठी पुरुष मंडळी यांनी मेहनत घेतली.छान मनमुराद गीतांचा आनंद घेवून कार्यक्रम सप्ताह यशस्वी करून आनंदी वातावरणात संपन्न झाला.सर्व महिलांना हळदीकुंकू लावून आणि रंग लावून होळीचा सूध्दा आनंद देण्यात आला
.