
रुग्णवाहिका बंद पडल्याने उपचाराअभावी शिवसेनेच्या माजी आमदाराचे निधन
शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे डोंबिवलीत निधन झाले. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात येत असताना रुग्णवाहिकाच बंद पडली.
त्यामुळे देसाई यांना वेळेत उपचार मिळाले नसल्याचा आरोप माजी आमदार देसाई यांच्या कुटुंबियांनी केलाय. सूर्यकांत देसाई हे परळ लालबाग मतदारसंघाचे आमदार होते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, देसाई यांची प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत होते.
तेव्हा ज्या रुग्णवाहिकेतून देसाई यांना नेण्यात येत होतं ती मधेच बंद पडली. यावेळी रुग्णवाहिकेला काही अंतर धक्काही द्यावा लागला. शेवटी रुग्णवाहिका सुरू न झाल्यानं दुसरी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. माजी आमदार देसाई यांना दुसऱ्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी देसाई यांचा इसीजी काढला. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली