अहमदाबाद: कधी कोट्यवधी अनुयायी असलेले आणि संतत्वाचा डंका पिटवून घेणारे आसाराम बापू (Asaram Bapu) आणखी एका बलात्काराच्या आरोपात दोषी (Rape Case) ठरलेले आहेत. अशाच एका गुन्ह्यात झालेल्या शिक्षेत आसाराम बापू सध्या जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेप भोगत आहेत. या दुसऱ्या प्रकरणात सूरतमध्ये एका शिष्येवर बलात्कार आणि अप्राकृत्रिक सेक्स केल्याच्या आरोपांत त्यांना कोर्टानं दोषी ठरवलंय. मंगळवारी म्हणजे आज त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. ज्या तरुणीवर बलात्काराच्या आरोपात आसाराम बापू यांना दोषी ठरवण्यात आलंय. त्याच तरुणीच्या लहान बहिणीची नारायण साई (Narayan Sai) याने वासनांधतेत शिकार केल्याचंही समोर आलंय. कोर्टाने यापूर्वीच साईला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.
दुष्कर्म, गुदामैथुन, छेडछाड, अवैध नियंत्रण मिळवणे, त्यासाठी बळाचा वापर करणे, गुन्हेगारी धमक्या देणे या सगळ्या अपराधात आसाराम बापू हे दोषी ठरलेले आहेत. या प्रकरणात आसाराम बापूची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती, मोटेरा आश्रमाचे पदाधिकारी ध्रुवबेन बालानी, जसवंतीबेन, निर्मला आणि मारी अशा सहा जणांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. या आरोपींविरोधात पुरावे मिळाले नसल्यानं त्यांची सुटका करण्यात आल्याचं आसाराम बापूंच्या वकिलांनी सांगितलं आहे.
81 वर्षांचे आसाराम सध्या जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतायेत. राजस्थानातील आश्रमात आसारामच्या वासनांधतेची बळी पडलेल्या तरुणीनं 2013 साली बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आसाराम यांना कोर्टात हजर करण्यात आलं. प्रकृतीच्या काराणामुळं सूरतच्या हॉस्पिटलमध्ये आसाराम यांची पत्नी दाखल असल्यानं त्या कोर्टात हजर नव्हत्या. तर आसाराम यांची मुलगी कोर्टात पोहचण्यासाठी उशीर झाल्यानं कोर्टाला निर्णय देण्याआधी वाट पाहावी लागली होती. त्यावेळी कोर्टात वकिलांव्यतिरिक्त इतर कुणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. पॉक्सो कायद्यांतर्गत या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर, सूरतची ही तरुणी समोर आली होती. 1997 ते 2006 या काळात तिच्यावर कसा अत्याचार करण्यात आला, हे तिनं सांगितलं. या तरुणीच्या लहान बहिणीवर लैगिंक शोषण केल्याच्या आरोपावरुन नारायण साई सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे.