ताज्या बातम्या
संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे माजी व्यवस्थापक बंडोपंत कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे माजी व्यवस्थापक बंडोपंत कुलकर्णी (वय 73) यांचे आज (दि. 20) वृद्धापकाळाने निधन झाले. 1972 ते 2014 ते माऊली मंदिरात कार्यरत होते.
त्यांनी पुजारी, शिपाई, लिपिक, व्यवस्थापक अशी विविध जबाबदारी पार पाडून माऊलींची मनोभावे सेवा केली.
त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, एक मुलगी असा परिवार आहे. बंडोपंत कुलकर्णी यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू होता. ते सर्वांना सहकार्य करत असत. त्यांच्या जाण्याने आळंदी देवस्थानसह ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.