ताज्या बातम्या

50 वर्षीय महिलेवर तीन वर्ष बलात्कार..


पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

एका सीएच्या कार्यालयात काम करणाऱ्या 50 वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करत सलग तीन वर्षे तिच्यावर बलात्कार करणाऱ्या सीएला पोलिसांनी अटक केली. येरवडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून 2019 ते 2022 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी एका 50 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध सतीश शेठ, वय 42, कांचनगंगा होम्स, डहाणूकर कॉलनी, कोथरूड हा सी ए आहे. कोथरूड परिसरात त्याचे ऑफिस आहे. फिर्यादी महिला त्याच्या ऑफिसमध्ये नोकरी करत होती. त्यामुळे दोघांची चांगली ओळख होती. मार्च 2019 मध्ये अनिरुद्ध शेठ यांनी फिर्यादी महिलेला क्लाइंटला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने भुगाव येथे नेले. भुगाव येथील फ्लॅटवर गेल्यानंतर आरोपीने पेस्ट्रीमध्ये गुंगीचे औषध देऊन फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले.

या सर्व घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी सोबत वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. मुंबई पुणे आणि अलिबाग येथील हॉटेलमध्ये आणि येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीत वेळोवेळी हा प्रकार घडला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध शेठ याने या महिलेसोबत पुन्हा जबरदस्ती करत याविषयी कोणाला सांगितल्यास फिर्यादीला आणि तिच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली आहे. या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *