पुण्याच्या राम माने यांना यंदाचा
सदाविजय आर्य कार्यकर्ता पुरस्कार
पुणे : पुण्याच्या आंतरभारतीचे सचिव व नाशिक जिल्ह्याचे आंतरभारती दूत श्री राम माने यांना यंदाचा कार्यकर्ता पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
या वर्षांपासून या पुरस्काराचे नाव सदाविजय आर्य कार्यकर्ता पुरस्कार असे राहील.
उदगीर येथे होणाऱ्या स्नेहमीलन सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
श्री राम माने यांचे पुण्याच्या कामातील योगदान आणि नाशिक येथे काम उभे रहावे यासाठी केलेली धडपड मुख्यता: ध्यानात घेण्यात आली.
दर वर्षी महाराष्ट्रातुन एका कार्यकर्त्यांची निवड केली जाते.
दि 20 नोव्हेंबर 22 रोजी सोलापूर येथे झालेल्या आंतर्भारतीच्या ट्रस्टी मंडळाने हा निर्णय घेतला असे कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी स्पष्ट केले
आंतरभारतीचे अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी, उपाध्यक्ष संगीता देशमुख, सचिव डॉ डी एस कोरे, कोषाध्यक्ष डॉ उमाकांत चनशेट्टी व सदस्या मनीषा आर्य यांनी श्री राम माने यांचे अभिनंदन केले.