ताज्या बातम्या

३१ बलात्कार एकाच आरोपीने केले,डीएनए चाचणीच्या मदतीने पोलिसांनी हा छडा लावला


गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो पुरावा मागे सोडतोच, याची प्रचिती ऑस्ट्रेलियातील एका प्रकरणात आली आहे. पोलिसांनी ३१ बलात्कार एकाच आरोपीने केल्याचे सिद्ध केले आहे.
डीएनए चाचणीच्या मदतीने पोलिसांनी हा छडा लावला आहे. या सर्व घटना १९८५ ते २००१ या कालावधीतील आहेत. या प्रकरणातील आरोपी किथ सिम्स याचे वयाच्या ६६ व्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात निधन झाले आहे. (Serial rapist identified after almost 40 years)

बलात्काराचे हे गुन्हे वेगवेगळ्या आरोपींनी केलेले असावेत असा पोलिसांचा सुरुवातीचा कयास होता. पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे गुन्हे सिम्स याने केल्याचे निष्पन्न झाले.
जॉगिंग अथवा व्यायाम करत असलेल्या महिलांवर हे अत्याचार झाले होते. त्यामुळे या गुन्ह्याचा उल्लेख ट्रॅकसूट रेपिस्ट असा केला जात आहे. सिम्सने पहिला गुन्हा १९८५ला तर शेवटचा गुन्हा २००१ला केला. सुरुवातीला या गुन्ह्यांचा तपास स्वतंत्रपणे करण्यात येत होता. पण काही वर्षांपासून पोलिस या गुन्ह्यांचा एकत्रित तपास करत होते. २०१९ ला पोलिसांना त्यांच्या डेटाबेसमध्ये एक डीएनए सँपल मिळाले, त्यातून पुढे साखळी जोडत पोलिसांनी हे गुन्हे सिम्सने केल्याचे सिद्ध केले.
पण सिम्सचा मृत्यू झालेला असल्याने या प्रकरणात कोणतीही कायदेशीर प्रक्रिया आता होऊ शकणार नाही. 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *