पीक विमा कंपनीने २७ महसुल मंडळे अग्रीमसाठी अपात्रेच्या अन्यायकारक निर्णया विरोधात लिंबागणेश येथे चक्काजाम आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

- पीक विमा कंपनीने २७ महसुल मंडळे अग्रीमसाठी अपात्रेच्या अन्यायकारक निर्णया विरोधात लिंबागणेश येथे चक्काजाम आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
पिक विमा कंपनीने ४७ महसुल मंडळींपैकी २७ महसुल मंडळे अग्रीम पिक वीमा साठी अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ तसेच महसुल मंडळातील गावांची सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित उत्पादकतेत येणारी घट टक्केवारी ५० पेक्षा जास्त असुनही असुनही अग्रिम पिकविमासाठी अपात्र ठरवण्याच्या पिकविमा कंपनीच्या अन्यायकारक धोरणाच्या निषेधार्थ तसेच तात्काळ महसुल मंडळ अग्रीम पिकविमासाठी पात्र करण्यात यावे या मुख्य मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२९ सप्टेंबर वार गुरूवार रोजी लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गवर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा लेखी निवेदनाद्वारे जिल्हाप्रशासनाला दिला आहे.
सविस्तर माहीतीस्तव:-
____
जिल्हाधिकारी बीड यांनी ४७ महसुल मंडळातील पीक विमा धारक शेतक-यांना विमा अग्रीम देण्याच्या संदर्भाने ३ वेगवेगळ्या अधिसुचना काढल्या होत्या. दि.१३ सप्टेंबर रोजी पिकविमा कंपनी प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत ४७ महसुल मंडळातील पिक विमा धारक शेतक-यांना अग्रीम देण्यासंदर्भात निर्णय झाला होता. एकुण तीन अधिसुचनाही काढण्यात आल्या होत्या. दरम्यान बजाज अलायन्झ पिक विमा कंपनीने जिल्हाधिकारी,जिल्हा अधिक्षक कृषी आधिकारी,औरंगाबाद विभागीय आयुक्त व पुणे येथील मुख्य सांख्यिकी विभागास पत्र लिहून बीड जिल्ह्य़ातील ४७ पैकी २७ महसुल मंडळे निकषात बसत नसल्याने अपात्र ठरवण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा व अग्रिम पीक विमा तात्काळ देण्यात यावा .
संपूर्ण बीड तालुक्यात उत्पादकतेत घट लिंबागणेश महसुल मंडळात ७० टक्के तरीही वगळले
_____
बीड तालुका कृषि विभागाच्या महसुल मंडळाची सोयाबीन पिकातील सर्वेक्षण मंडळ निहाय अहवाल नुसार लिंबागणेश महसुल मंडळातील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित उत्पादकतेत येणारी घट टक्केवारी ७० असुन सुद्धा लिंबागणेश,नेकनुर,पिंपळनेर,
घाटसावळी,येळंबघाट,चौसाळा व अन्य २१ अशी एकूण २७ मंडळे अपात्र ठरविण्यात आली असून या अन्यायकारक निर्णया विरोधात अपात्रेतचा निर्णय तात्काळ रद्दबातल करण्यात येऊन अग्रीम पिक विमा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी
दि.२९ सप्टेंबर २०२२ वार गुरूवार रोजी सकाळी ११ वाजता लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२