ताज्या बातम्या
बीड पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेची छेड काढत व्हिडीओ काढला जाब विचारायला गेलेल्या पीडितेच्या परिवाराला बेदम मारहाण
बीड : कामखेडा गावातील धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. यात लाठ्या-काठ्या आणि व्हिडीओमधील तुफान हाणामारी पाहून अंगावर काटा येईल. या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीड तालुक्यातील कामखेडा गावात पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेची छेड काढत व्हिडीओ काढला. यानंतर याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित महिलेच्या कुटुंबातील सदस्यांवर जमावाने हल्ला केला. दहा ते पंधरा लोकांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे