
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना ह्दयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.धनंजय मुंडे यांना अचानक किरकोळ त्रास जाणवू लागला. त्यानंतर मुंडेंना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. धनंजय मुंडेना उपचारासाठी ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) देखील रूग्णालयात पोहोचले.
राजेश टोपे यांनी रूग्णालयात जाऊन धनंजय मुंडेंची चौकशी केली व डॉक्टरांची देखील भेट घेतली. डॉक्टर धनंजय मुंडेंच्या प्रकृतीवर लक्ष्य ठेवून असून त्यांनी एमआरआय (MRI) देखील केलं आहे. तर सध्या सर्व नॉर्मल असल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत.