मशिदीवर धाडी टाका, आणि भोंगे काढा, या विधानानंतर मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढी पाडवा मेळाव्यातील भाषणांवरून राजकारण चांगलेच तापले आहे. मशिदीवर धाडी टाका आणि भोंगे काढा अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते. या विधानानंतर आता मनसेच्या मुस्लिम समाजामध्ये राज ठाकरेंविरोधात रोष निर्माण झाला असून त्यामुळे आता मनसेच्या अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.राज ठाकरे यांचे गुढीपाडवा मेळाव्यातील भाषण इतर भाषणापेंक्षा वेगळे होते. गेल्या काही वर्षापासून ते हिंदुत्वाच्या राजकारणाक़डे वळताना दिसत होते. मग ते पक्षाच्या चिन्हामध्ये बदल असो, अथवा मनसेच्या या शब्दाला मंचावरील बदलेला कलर असो. त्यातच नुकत्याच केलेल्या भाषणात त्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कारच केला होता. मशिदीवर धाडी टाका, आणि भोंगे काढा, अशा आशयाचे विधान त्यांनी केल्याने आता मनसेतील मुस्लिम पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत पुण्यात मनसेच्या मुस्लिम पदाधिकारी राजीनामा देत आहेत. पुणे शहरातील शाखा अध्यक्ष माजीद शेख यांच्यासह मुस्लिम पदाधिकारी यांनी राजीनामे दिले आहेत. विकास, बेरोजगारी, महागाई, शिक्षण, महिला सक्षमीकरण हे मुद्दे सोडून जाती-धर्माच्या आधारावर राजकारण केले जात असल्याने राजीनामा देत असल्याने शेख यांनी पत्रात म्हटले आहे.