बीड: बीडमध्ये घराच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका नवविवाहितेचा मृत्यू झाला आहे. तर माझ्या मुलीला सासरच्या मंडळींनी खाली फेकून देऊन तिची हत्या केलीय असा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे.यावरून नवऱ्यासह सासरच्या मंडळींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शहरातील शाहू नगर भागात घडली आहे. यास्मिन शेख असं मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
बीड शहरातील (Beed District) इस्लामपुरा भागात राहणाऱ्या, रहीम शरिफोद्दिन शेख यांची मुलगी यास्मिन शेख हिचा विवाह 26 ऑक्टोबर 2021 रोजी तिचा विवाह शकूर बशीर शेख वय 29 याच्याशी करण्यात आला होता. शकूर हा गवंडीकाम करतो. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर यास्मिन सासरी जाच होण्यास सुरुवात झाला. यादरम्यान आज यासमीनला तिसऱ्या मजल्यावरून फेकून संपविल्याचा आरोप यास्मिनचे वडील रहीम शेख यांनी केला आहे.
दरम्यान याप्रकरणी रहीम शेख यांच्या फिर्यादीवरून पती शकूर बशीर बेग, दीर शेख नसीर बशीर, जाऊ सोफेया नसीर शेख विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे