महाविकास आघाडी सरकारचा तिसरा सन 2022 – 23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 11) विधानसभेत सादर केला.
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार
संभाजी महाराजांचे स्मारक हवेली येथे उभारणार. 25 कोटी रुपयांची तरतूद
राज्यातील 306 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सक्षमीकरणासाठी हजारो कोटींची घोषणा
पिक कर्ज वाटपात वाढ
नियमित कर्ज फेडणा-या शेतक-यांना 50 हजारांएवजी 75 हजारांचे अनुदान
गोसेखुर्द प्रकल्पाची सर्व कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार
पुढील दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी
जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांची तरतूद
यावर्षी एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लावण्याचे उद्दिष्ट
देशी गायी आणि म्हशींची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न
किनारी भागातील मासळी उत्पादन करणा-या केंद्रांची देखभाल करणार
मुंबईतील पशुवैद्यकीय रूग्णालयाला 10 कोटी रुपये निधी
प्रत्येक महसूल विभागात एक शेळी प्रकल्प
सदृश पशुधनासाठी तीन फिरत्या प्रयोगशाळा
आरोग्य सेवांवर येत्या तीन वर्षात 11 हजार कोटींचा खर्च करणार
येत्या तीन वर्षात शासकीय रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेशिवाय किडनी स्टोन काढण्याची उपचार पद्धती सुरु करणार. त्यासाठी 17 कोटी पेक्षा अधिक निधी
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा
विदर्भ, मराठवाड्यात कापूस सोयाबीन शेतक-यांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न
दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार.
आरोग्यासाठी तीन हजार 800 कोटी रुपयांची तरतूद
आठ कोटी रुपयांची आठ मोबाईल कर्करोग निदान वाहने पुरवणार
टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगड मधील खानापूर येथील जमीन देणार
प्रत्येक जिल्ह्यात टेलीमेडिसिन रुग्णालय उभारणार. तीन हजार 183 कोटींचा निधी
पुणे शहरात तीनशे एकर क्षेत्रावर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार. सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध होणार
प्रशिक्षित मनुष्यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्नित करणार
पाच हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण देणार
मुंबई विद्यापीठातील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटी रुपये
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, क्रांतिसिंह नाना पाटील, तसेच थोर समाजसुधारकांच्या जन्म गावातील शाळाच्या सुधारणेसाठी निधी
थोर समाजसुधारकांच्या नावाने प्रबोधन केंद्र सुरु करणार
भीमा कोरेगाव विजय स्तंभ येथील सोयी सुविधा आणि विकासाची कामे करणार
गटार सफाई यंत्रचलीत पद्धतीने होणार
तृतीयपंथीयांना ओळखपत्रे, रेशनकार्ड देण्याची विशेष मोहीम राबवणार
शालेय शिक्षण विभागासाठी दोन हजार 354 कोटी रुपये
क्रीडा विभागासाठी 354 कोटी रुपये
आदिवादी विकास विभागाला 11 हजार 999 कोटी रुपये
सामाजिक न्याय विभागाला 2 हजार 876 कोटी रुपये
आश्रम शाळांसाठी 400 कोटींचा निधी
महिला आणि बालविकास विभागाला 2 हजार 472 कोटी रुपये
पुणे रिंगरोडसाठी एक हजार 700 रुपयांचा निधी
समृद्धी महामार्ग 77 टक्के काम पूर्ण. समृद्धी महामार्ग गोंदिया, गडचिरोली पर्यंत वाढणार
महिला शेतक-यांना अधिक अनुदान देणार
मुंबईतील रस्ते आणि लोहमार्गावरील वाहतूक कमी करण्यासाठी जलवाहतूक सुरु करणार. जलमार्गासाठी 330 कोटी रुपये निधी
एसटी ही ग्रामीण भागातील नागरिकांचा मुख्य आधार आहे. एसटीला एक हजार पर्यावरण पूरक बस उपलब्ध करून देणार. एसटी महामंडळाला तीन हजार तीन कोटी रुपयांचा निधी
नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी ८० टक्के खर्च राज्य सरकार करणार
राज्य वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीत सक्षम झाले आहे.
शिर्डी विमानतळाला 150 कोटी रुपये निधी
इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी वाढली. सन 2025 पर्यंत पाच हजार चार्जिंग स्टेशन उभारणार
मेग्नेटीक महाराष्ट्र अंतर्गत 98 गुंतवणूक करार. एक लाख 89 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
कोविडमध्ये विधवा झालेल्या महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाचे व्याज पूर्णपणे माफ करणार
मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार
उर्जा विभागाला नऊ हजार 900 कोटींची तरतूद
मुंबईच्या आजूबाजूच्या परिसराला जलमार्गाने जोडणार
गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव
रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटी रुपये
महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसेनानी, थोर समाजसेवक यांचा परिचय नवीन पिढीला होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर येथे हेरीटेज वॉक सुरु करणार
लोणावळा येथील टायगर पोइंट येथे सुविधा निर्माण करणार
कामगार विभागासाठी एक हजार 400 कोटी रुपये
पाणी विभागाला तीन हजार 223 कोटी रुपये
कोकण विभागाला आपत्तीसाठी तीन हजार 200 कोटी रुपये
18 जलदगती, 24 , 14 कुटुंब न्यायालये उभारण्यासाठी निधी
आठ कोटी 70 पेक्षा अधिक शिवभोजन थाळ्या उपलब्ध करून दिल्या
राजगड, तोरणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 14 कोटी रुपये
पर्यटन विभागाला एक हजार 704 कोटी रुपये
सैन्य दल रुग्णालयांच्या धर्तीवर पोलिसांसाठी विशेशोपचार रुग्णालये उभारणार
नक्षलग्रस्त भागातील पोलिसांच्या मासिक भत्त्यात दुप्पट वाढ
गृह विभागाला एक हजार 896 कोटी रुपये निधी
पंढरपूर देवस्थान विकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार
राज्यातील वन क्षेत्रात वाढ झाली. चंद्रपूर शहरात वन्यजीव बचाव केंद्र उभारणार
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील. मराठी भाषा भवन मुंबईत उभारणार. 102 कोटी रुपये खर्च. गुढी पाढव्याला उद्घाटन
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकांचे गाव उभारणार
शिवाजी महाराजांचे किल्ले, गनिमी कावे यांना जागतिक वारसा घोषित करण्यासाठी प्रयत्न करणार
पुण्यातील महात्मा फुले स्मारक विकासाठी 100 कोटी रुपये निधी
कोल्हापूर येथील शाहू महाराज स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देणार
जगनाडे महाजारांचे मावळ तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी
महाराणी सईबाई स्मृतीस्थळासाठी निधी देणार
जायकवाडी, गोसीखुर्द जलपर्यटनाला चालना देणार
24 हजार 35३ कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प
सीएनजीवरील कर 13.5 वरून तीन टक्के एवढा करणार
राज्यात सीएनजी स्वस्त होणार
सोन्यावरील मुद्रांक शुल्क माफ