भारतीय नौदलाने स्टेल्थ डिस्ट्रॉयर INS चेन्नई वरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रावर विस्तारित पल्ल्याचा जमिनीवर हल्ला करण्याच्या अचूकतेचे यशस्वीपणे प्रात्यक्षिक पार पडले.
आज हे प्रात्यक्षिक पार पडले असल्याची माहिती भारतीय नौदलाकडून देण्यात आली.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र आणि आयएनएस चेन्नई या दोन्ही क्षेपणास्त्रे स्वदेशी बनावटीची आहेत. भारतीय क्षेपणास्त्र आणि जहाज बांधणीतील आपली सक्षमता आणि पराक्रमाच्या अत्याधुनिकतेचे एक उदाहरण आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ प्रयत्नांमध्ये भारतीय नौदलाच्या योगदानाला बळकटी मिळत आहे.
आज झालेले यशस्वी प्रात्यक्षिक भारतीय नौदलाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. याद्वारे समुद्रात खोलवर मारा करण्याची क्षमता आणि समुद्रापासून दूर असलेल्या जमिनीवरील मोहिमेतील लक्ष्य भेदण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे आता भारतीय नौदलाच्या ताकद वाढ होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राच्या लँड अॅटकची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी अंदमान आणि निकोबार बेट समूहाजवळ पार पडली होती. सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र DRDO ने विकसित केले आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र 400 किमी अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते