चौसाळा येथील पत्रकार विकास नाईकवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी पुरस्कार प्रदान
42 वर्ष सेवा देणाऱ्या पोस्टमॅन रामकिसन नाईक यांना पूर्ण पोशाख व ट्रॉफी देऊन केला सन्मान
चौसाळा येथील पोस्ट ऑफिस मधील गेली 42 वर्षे सेवा देणारे पोस्टमन रामकिसन नाईक यांना चौसाळा येथील सामाजिक उपक्रम राबविणारे पत्रकार विकास नाईकवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी पुरस्कार 2022 हा पुरस्कार दिनांक 26 जानेवारी रोजी झेंडावंदन झाल्यानंतर चौसाळा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंचपती मधुकर तोडकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव मोठे ग्रामसेवक बाबासाहेब चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला .
यावेळी 42 वर्षे सेवा देणारे पोस्टमन पोस्टमध्ये आलेले महत्वाचे कागदपत्र स्वतः घरी जाऊन प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या हातातच देतात व गाडी सायकल असे काहीही चालवता येत नसल्याने पाई चलत 42 वर्ष सेवा देत आहेत या सेवेमुळे सामाजिक उपक्रम राबविणारे पत्रकार विकास नाईकवाडे यांच्यातर्फे रामकिसन नाईक यांना संपूर्ण पोशाख एक ट्रॉफी शाल नारळ फेटा देऊळ त्यांचा मानसन्मान केला हा सन्मान व पुरस्कार 42 सेवा देणाऱ्या व्यक्तीला देण्याचे काम व चौसाळा येथे विविध उपयोगी सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम पत्रकार विकास नाईकवाडे हे सतत करत असतात असे उपस्थित गावातील नागरिकांनी म्हटले यावेळी सरपंचपती मधुकर तोडकर वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैभव मोटे ग्रामसेवक बाबासाहेब चव्हाण व्यापारी आनंद लोढा, अशोक जोगदंड, उद्धव नाईकवाडे ,उमेश जोगदंड, गणेश कुलकर्णी ,बापू पवार पत्रकार अमोल तांदळे, सगळे सर ग्रामपंचायत मधील कर्मचारी प्रभू पिसाळ, ईसाक शेख ,मनोज वाघमारे, राम मस्के, भोसले मॅडम उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला उपस्थितांचे पत्रकार विकास नाईकवाडे यांनी आभार मानले.