Video : व्हिडिओ

भारतापाठोपाठ पाकिस्तानने देखील लॉन्च केलं चांद्रयान; व्हायरल व्हिडिओ पहा


शुक्रवार दि.14 जुलै रोजी अंतराळ क्षेत्रात भारताने नवा विक्रम आहे. काल भारतीय शास्त्रज्ञांनी दुपारी 2.30 वाजता श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 प्रक्षेपित केले. केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाचे डोळे या मोहिमेकडे लागले होते.

चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत, त्याची रोबोटिक उपकरणे 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या त्या भागावर (शॅकलटन क्रेटर) उतरू शकतात, जिथे आतापर्यंत कोणत्याही देशाचे मिशन पोहोचलेले नाही.

त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या होत्या. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण एलएमव्ही-3 रॉकेटमधून करण्यात आले. चंद्राच्या पृष्ठभागावर लॅंडर यशस्वीपणे उतरवण्यासाठी त्यात अनेक प्रकारची सुरक्षा उपकरणे बसवण्यात आली आहेत.

काल पासून सोशल मीडियावर चांद्रयान-3 चे अनेक फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत असून, नागरिक देखील यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. जे पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतोय.

 

मात्र, सध्या चांद्रयानाशी संबंधित असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटकरी भन्नाट अश्या कमेंट करत आहेत. जो पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल. व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाकिस्तान मधील असल्याचं सांगण्यात येत आहे.

ट्विटरवर @Atheist_Krishna नावाच्या आयडीसह हा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “चंद्रावर पोहोचण्यासाठी इस्रो चांद्रयान-3 वर 615 कोटींपेक्षा जास्त खर्च करत आहे, तर पाकिस्तान 15 रुपयांपेक्षा कमी खर्च करत आहे’. सध्या या पोस्टवर नेटकरी तुफान कमेंट करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन लोक छतावर उभे आहेत आणि काही लोक खाली उभे आहेत आणि रॉकेटसारख्या मोठ्या फुग्याच्या आत आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. फुग्याला आग लागताच फुगा हवेत उडून जातो आणि उडताना दूर जातो. हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचा दावा केला जात आहे.

अवघ्या 35 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाख 20 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 5 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक करत विविध मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक याला पाकिस्तानचे ‘चांद्रयान’ म्हणत असून, यावर मजेशीर कमेंट करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *