Video : व्हिडिओ

Video : सांगलीकरांचा नाद खुळा! आकाशात सोडलं ‘दुसरं चांद्रयान’; तरूणाईचा जल्लोष


सांगली : श्रीहरी कोटा येथून चांद्रयान – ३ या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. या चांद्रयानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते. तर यशस्वी प्रक्षेपणानंतर देशभर जल्लोष व्यक्त करण्यात आला.

तर चांद्रयानाच्या प्रक्षेपणाचा आनंद महाराष्ट्रातील सांगली येथे अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवठे एकंद तालुक्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. फटाके बनवणाऱ्या कारखान्यांचे गाव म्हणून या गावाची ओळख आहे. येथे दसऱ्याला शोभेच्या दारूची आतिषबाजी होत असते. तर चांद्रयानाच्या प्रक्षेपणाचा जल्लोष कवठे एकंद करांनी यान आकाशात उडवून केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

दरम्यान, सचिन पाटील यांनी ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर यामध्ये चांद्रयान -३ ची प्रतिकृती तयार करण्यात आली असून त्यामध्ये शोभेची दारू भरली आहे. तर दारू पेटवल्यानंतर हे यान जवळपास २० ते २५ फुटापर्यंत वर जाते आणि त्यातून पुढे शोभेच्या दारूचे फटाके फोडले जातात. तर डीजेच्या तालावर काही तरूण मुले जल्लोष करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *