राज्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी आता केंद्राकडून येणार मदत! अमित शहांचा हिरवा कंदील; मुख्यमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्रात २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ झाहीर झाला आहे. त्यासाठी नुकसान भरपाईची नियमावली देखील जाहीर झाली आहे. राज्याकडून देण्यात येणारी मदतही कमी पडत असल्याचं चित्र आहे.
यापार्श्वभूमीवर केंद्रातील शिष्टमंडळ राज्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळं महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीसाठी केंद्र शासनाकडून भरीव मदत केली जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घतली यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणयासाठी एनडीआरएफच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळून देण्यात येईल असं आश्वासन केंद्राकडून देण्यात आलं आहे.
शहा यांची भेट घेऊन दुष्काळाच्या मदतीबाबत निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार आहे, चाऱ्याची देखील समस्या निर्माण होणार आहे. जवळपास ३२ जिल्ह्यांमध्ये आपल्याला दुष्काळ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. यामध्ये ८० टक्के तालुके हे दुष्काळानं प्रभावित आहेत. म्हणूनच विशेष मदत केंद्र सरकारनं महाराष्ट्राला करावी आणि आम्ही जो प्रस्ताव पाठवतो आहे त्यासंदर्भात तात्काळ केंद्राची टीम यावी अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे”
त्याचबरोबर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी देखील आमची चर्चा झाली होती. ८ तारखेपासून ११ तारखेपर्यंत महाराष्ट्रातील विविध भागात दुष्काळाची परिस्थिती काय आहे? याचा आढावा ही टीम घेणार आहे. त्यानंतर आपला रिपोर्ट ही टीम एनडीआरएफकडे पाठवेल. तसंच त्यांचा रिपोर्ट आणि आपण पाठवलेला प्रस्ताव याच्या आधारावर एनडीआरएफ आपला निर्णय करेल, असंही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
अत्यंत वेगानं याबाबत निर्णय होत आहेत. मी त्यांना विशेष विनंती केली की एकूण दुष्काळाची परिस्थीती पाहता केंद्रानं आपल्याला विशेष मदत करावी. यासाठी गृहमंत्र्यांनीही सकारात्मकता दाखवली आहे. नियमात बसवून जास्तीत जास्त मदत आपल्याला भारत सरकार केरल असं आश्वासनही शहा यांनी आपल्याला दिलं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.



