Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

सियाच्या फोनमधून 21 वर्षाच्या ‘मानसी गोविंदपूरकर’चं कनेक्शन समोर! केतनच्या हत्येनंतर Chat GPT ला विचारलं ‘दु:ख कसं व्यक्त करायचं?’

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल प्रकरणात आता अनेक अपडेट समोर येत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटनंतर प्रकरणातील अनेक गोष्टींचा खुलासा आहे. आहे. अशातच पुण्यात यापूर्वी घडलेल्या हत्याकांडांचा आणि लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या मृत्यूंचाही सखोल अभ्यास केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

सिया गोयलच्या फोनलमधून अनेक गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या असून आता मानसी गोविंदपूरकर मृत्यू प्रकरणातं कनेक्शन देखील सिया गोयल प्रकरणात समोर आलंय.

मानसी गोविंदपूरकर कोण होती?

सिया गोयलने केतनला मारण्यासाठी लोणावळा आणि आसपासच्या परिसराचा आढावा घेतला होता. त्यावेळी तिने टायगर पाईंट आणि लोहगडाची माहिती शोधली. लोणावळा परिसरात यापूर्वी याचपद्धतीने घडलेल्या दरीत पडून मृत्यूच्या घटनांचाही शोध घेण्यात आला. त्यावेळी सिया गोयलला मानसी गोविंदपूरकर नावाच्या तरुणीची माहित मिळाली. टायगर पॉइंट तसेच लोहगड परिसरात मानसी गोविंदपूरकर तरुणीचा पडून मृत्यू झाल्याच्या घटनांची माहिती आरोपींनी शोधली गेली होती.

मानसी गोविंदपूरकरचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी

20 मार्च 2025 रोजी सांगवीमधील रहिवासी मानसी गोविंदपूरकर हिचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी सापडला होता. 21 वर्षाच्या मानसीचा मृतदेह नवग्रह मंदिराजवळील झुडुपात आढळला होता. याचाच शोध सियाने घेतला अन् केतनला लोहगडावरच संपवायचं ठरवलं. सिया, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांच्यात ही माहिती सोशल मीडिया आणि मेसेजिंग माध्यमातून शेअर झाल्याचं देखील पोलिसांचे म्हणणं आहे. त्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

राजा रघुवंशी हत्याकांडाचा अभ्यास

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्येचा कट रचण्याच्या दिवशी आरोपींनी सुरुवातीला सोनम रघुवंशी हिने घडवलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडाचा अभ्यास केला. त्यातील चुकांची माहिती त्यांनी शोधल्याचे तपासात आढळलं आहे. त्यानंतर लोणावळा आणि टायगट पॉईंट परिसरात अशा प्रकारचे लोकेशन देखील शोधण्यात आले होते. अशातच आता कोर्टात या केसमध्ये काय काय समोर येणार? असा प्रश्न पडला आहे. तसेच सिया गोयलचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *