Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

हिंदीत बोला, यार तुमची मराठी. महेश मांजरेकरांसोबत काम करताना अमिताभ बच्चन यांनी अशी अजब मागणी का केली?

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बऱ्याच मराठी आणि हिंदी फिल्ममध्ये काम केले असून काही फिल्म त्यांनी दिग्दर्शितही केल्या आहेत. अगदी नवख्या, छोट्या कलाकारांपासून ते बॉलिवूडच्या बड्या कालाकारांसह त्यांनी काम केलंय. यामध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. एकदा महेश मांजरेकरांसोबत त्यांच्या एका फिल्ममध्ये काम करताना अमिताभ बच्चन यांनी हिंदीबद्दल एक विधान केले होते ज्याचा किस्सा मांजरेकरांनी बोलून दाखवला आहे. अमिताभ बच्चन यांनी महेश मांजरेकरांच्या ‘विरुद्ध’ चित्रपटामध्ये केले होते.या चित्रपटादरम्यान घडलेला एका प्रसंगावर भाष्य केले आहे, हिंदी स्टार्ससोबत काम करण्याबाबत सांगताना महेश मांजरेकर म्हणाले, “संजय दत्त बरोबर काम केले, कोणी त्याला घेत नव्हते, मला कित्येक लोकांनी सांगितले अरे याला का घेतो?

मराठीतल्या एका मोठ्या थोर नटाने मला सांगितले संजूसोबत काम म्हणजे तू दगडाबरोबर काम करण्यासारखे आहे. मी त्यांना म्हटले तुम्ही चित्रपट बघा आणि नंतर मला सांगा.” असे मांजरेकरांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *