Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

इराणने करार करावा, त्यांना सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवू, डोनाल्ड ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा

 राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषणात अमेरिकेची ताकद वाढल्याचा दावा करत इराणने करार करावा, त्यांना या जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र आम्ही बनवू असे वक्तव्य केले.

ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह आठ युद्धे सोडवल्याचा दावा केला. तेलाच्या किमती घसरतील असे सांगत अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांपासून आपण दूर आहोत, असे त्यांनी सांगितले.

भाषण सुरू होताच इराणी प्रतिनिधींचा सभात्याग ट्रम्प यांनी भाषणात इराणचा उल्लेख सुरू करताच इराणच्या प्रतिनिधी मंडळातील सदस्य सभागृहातून बाहेर पडले. केवळ एक सदस्य सभागृहात पूर्ण भाषणादरम्यान हजर होता. ट्रम्प यांच्या भाषणावेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान व परराष्ट्रमंत्री अराघची हे अनुपस्थित होते. हे दोघे बैठकीसाठी न्यूयॉर्कमध्ये आलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *