Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

राम मंदिरातून नोटा चोरण्याच्या घडल्या १०५ घटना : कोर्ट

अयोध्येतील राम मंदिरात देणगी मिळालेली रोख रक्कम मोजण्याच्या कक्षातून नोटा चोरण्याच्या किंवा लपवून ठेवण्याच्या १०५ घटना एसआयटीने शोधून काढल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालाची सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची, न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने पाहणी केली.

२०० किलो चांदीच्या विटा, ३८.२८८ किलो चांदीच्या विटा, चांदीचा हार, चरण पादुका व रामचरितमानसशी संबंधित देणगी यांच्या हाताळणीत कोणतीही तफावत आढळली नसल्याचे एसआयटीच्या अहवालात नमूद केले आहे. उत्तर प्रदेशच्यावतीने बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सोमवारी खंडपीठाला सांगितले की, एसआयटी २५ सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी आपले पहिले आरोपपत्र दाखल करेल. या प्रकरणात आठ आरोपींची ओळख पटवण्यात आली असून, त्यांच्या खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम तसेच चोरीचे पैसे ज्या जंगम आणि स्थावर मालमत्तेत गुंतविले त्याचा तपशील अहवालात देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *