Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

ईठा’ मुळे बदलली प्रभासच्या ‘फौजी’ची रिलीज डेट? अखेर खरं कारण आलं समोर

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने पाहत असतात. लकरच प्रभास हॉरर, कॉमेडी व फँटसी यांचे जबरदस्त पॅकेज असलेला फौजी हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘द राजा साब’ नंतर प्रभास एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. अलिकडेच ‘फौजी’ या सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करत निर्मात्यांनी ३ डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती. परंतु, आता या चित्रपटाबाबत आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. ‘फौजी’ चित्रपटाची रिलीज डेट आता आणखी पुढे ढकलण्यात आली आहे. अनेकांना ‘ईठा’सिनेमामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलली गेल्याचं वाटत होतं. अशातच यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.निर्मात्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

मैत्री मुव्ही मेकर्सचे निर्माते रवी शंकर यांनी २१ सप्टेंबर रोजी ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज कार्यक्रमात एक महत्त्वपूर्ण खुलासा केला. त्यांनी सांगितले की चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत आहे, परंतु मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा उपयोग या प्रोजेक्टच्या उत्तम निर्मितीसाठी केला जाईल, असं आश्वासनही त्यांनी चाहत्यांना दिलं. ते म्हणाले, “‘फौजी’चं प्रदर्शन थोडं पुढे ढकललं जात आहे. पण हा एक जबरदस्त चित्रपट आहे. ‘बाहुबली’नंतर तुम्ही प्रभासला इतक्या आकर्षक लूकमध्ये पाहिले नसेल. हा चित्रपट त्याच दर्जाचा आहे. मात्र, त्याचं प्रदर्शन थोडे पुढे ढकलल्याचं आम्हाला सुद्धा वाईट वाटतंय. हा चित्रपट तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील. हा एक भव्य आणि अद्भुत चित्रपट आहे.”

मैत्री मूव्ही मेकर्सच्या बॅनरखाली निर्मिती झालेला आणि टी-सीरिज फिल्म्स प्रस्तुत प्रभासचा फौजी चित्रपट ३ डिसेंबर २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार होता.मात्र, आता रिलीजची तारीख आणखी पुढे ढकळण्यात आली आहे. याचकाळात श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ हे चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. मात्र, आता प्रभासने माघार घेतल्याने प्रेक्षकांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, निर्माते हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित करतील असा अंदाज बांधण्यात येत आहे.

‘फौजी’ च्या माध्यमातून प्रभास ‘बाहुबली’नंतर पुन्हा एकदा भव्य पीरियड ड्रामामध्ये पुनरागमन करत आहे. भावनांनी परिपूर्ण कथा आणि नेत्रदीपक दृश्यांनी सजलेला एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव हा चित्रपट प्रेक्षकांना देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *