Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

न्यूयॉर्कला पोहोचताच शाहबाज शरीफ यांची आंतरराष्ट्रीय नाचक्की; रस्त्यांवर ‘चोर’ आणि ‘चेरी ब्लॉसम’चे पोस्टर्स

संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१ व्या अधिवेशनासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेले पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा अत्यंत मानहानीकारक परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे.

विमानतळावर अमेरिकन प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यानंतर, आता न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर त्यांच्याच देशातील नागरिकांनी आणि पीटीआय समर्थकांनी शहबाज सरकारविरोधात आक्रमक निदर्शने करत थेट ‘चोर’ आणि ‘चेरी ब्लॉसम’चे पोस्टर्स लावून त्यांची लाज काढली आहे.

विमानतळावर अमेरिकेकडून दुर्लक्ष; ‘टॉयलेट पेपर’ विधानाची आठवण

शहबाज शरीफ संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये पोहोचले खरे; मात्र विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी अमेरिकन प्रशासनाचा एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावात मध्यस्थी करण्यात अपयशी ठरल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीच काही काळापूर्वी “अमेरिका पाकिस्तानला गरज संपल्यावर टॉयलेट पेपरसारखा वापरून फेकून देते” असे वादग्रस्त विधान केले होते, याचीच प्रचिती न्यूयॉर्कमध्ये आल्याची चर्चा आता रंगली आहे.

पेन स्टेशनबाहेर ‘चोर’, ‘फॉर्म ४७ सरकार’चे फलक

पाकिस्तानच्या आर्थिक दिवाळखोरीच्या पार्श्वभूमीवर, काटकसर दाखवण्यासाठी शहबाज शरीफ केवळ उपमुख्यमंत्री इशाक दार आणि विशेष सहाय्यक तारिक फातमी यांच्यासह लहान शिष्टमंडळ घेऊन अमेरिकेत दाखल झाले आहेत. मात्र, अमेरिकेत स्थायिक असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनीच त्यांचा हा ढोंगीपणा उघडा पाडला. न्यूयॉर्कमधील सर्वाधिक गजबजलेल्या ‘पेन स्टेशन’बाहेर इम्रान खान यांच्या पीटीआय समर्थकांनी फलकबाजी केली.

‘चेरी ब्लॉसम’ आणि ‘चोर’ : पोस्टर्सवर शहबाज शरीफ यांना बूट पॉलिश करणारे (‘चेरी ब्लॉसम’) आणि ‘चोर’ असे संबोधत “चोरांचे सरकार नामंजूर” असल्याच्या घोषणा छापण्यात आल्या आहेत.

फॉर्म ४७ सरकार : निवडणुकीत घोटाळे करून सत्तेत आलेले ‘फॉर्म ४७ सरकार’ असे म्हणत त्यांच्या जनमानसातील वैधतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी : पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेला फॅसिझम बंद करून माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याची मागणी फलकांवर ठळकपणे मांडण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *