सिंधुदुर्गच्या राजकारणात आमदारकीची चर्चा असतानाच केसरकरांचे पुन्हा मोठे विधान; ‘नव्या नेतृत्वाचा उदय…’

सिंधुदुर्गच्या राजकारणात शिवसेनेतील आमदारकीच्या चर्चांना वेग आला असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मागितलेल्या NOC ची चर्चा होताना दिसत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या आमदारकीबाबत त्यांनी भाष्य केले होते.
ज्यानंतर आगामी काळात माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचा राजकीय वारसदार परब असतील अशी चर्चा होताना दिसत आहे.
त्यांनी आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती भविष्यात राजकारणात येणार नसल्याचे जाहीर केले. या घोषणेमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले असतानाच त्यांचे आणखी एक वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी नवोदित नेतृत्वाचा उदय झाला आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर सावंतवाडी येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.
दीर्घ प्रतीक्षेनंतर, तब्बल पाच वर्षांनंतर स्थानिक विकास संस्थांना पुन्हा एकदा नवे आणि तरुण नेतृत्व लाभले आहे. विकासाच्या या प्रवासात नवीन रक्ताला वाव मिळाल्याने तळागाळातील विकासाच्या रथाला आता नवी गती मिळण्याची चिन्हे असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे.
नगर परिषदांसोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्याने ग्रामीणव शहरी भागात नवोदित नेतृत्वाचा उदय झाल्याचे देखील यावेळी केसरकर यांनी म्हटले आहे. केसरकर यांनी, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्याही राज्याच्या किंवा देशाच्या विकासाची पहिली पायरी असतात. या संस्थांच्या माध्यमातूनच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट निगडित प्रश्न सोडवले जातात.
ग्रामपंचायती या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असल्याने जिल्हा परिषदेची भूमिका महत्वाची असते. त्याचे आदर्श उदाहरण हे आपले राज्य आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात ते संपूर्ण देशाला दिल्याचे देखील केसरकर यांनी म्हटले आहे.
आता जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्यांची सत्ता ही आता नव्या नेतृत्वाची हाती सत्ता आली आहे. यामुळे शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि शेती या मूलभूत क्षेत्रांमध्ये अधिक प्रभावी काम होईल आणि लोकशाही तळागाळापर्यंत अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त्तकेली जात असल्याचे आ. केसरकर म्हणाले.



