Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

केंद्रीय कृषी सचिव चंद्रा यांच्यासह अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पुणे दौऱ्यावर

पुुणे जिल्ह्यातील खरीप पिके, फळबागा आणि विविध कृषी प्रक्रिया उद्योगांची माहिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषी सचिव आतिश चंद्रा यांच्यासह अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आज (ता.२२) पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या एक दिवसीय दौऱ्यात हवेली, पुरंदर, भोर, मुळशी आणि मावळ तालुक्यांतील विविध ठिकाणी भेटी देणार आहे.

या दौऱ्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात काही भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर पिकांची स्थिती, फळबागांचे व्यवस्थापन, शेतीमालाचे उत्पादन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील अडचणी याबाबत माहिती घेतली जाणार आहे.

पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे सीताफळ बागेची पाहणी करण्यात येणार आहे. बाग व्यवस्थापन आणि उत्पादन पद्धती याबाबत माहिती घेऊन सचिन झेंडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. त्यानंतर येथील शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देऊन शेतमालाचे एकत्रीकरण, सामूहिक विपणन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ जोडणी याबाबत माहिती घेतली जाणार आहे.

या वेळी विठ्ठल झेंडे यांच्यासह शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. अंजीर उत्पादनातील तंत्रज्ञान, गुणवत्ता सुधारणा, काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि विपणन पद्धती याबाबतही चर्चा केली जाणार आहे. या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी, उत्पादन पद्धती, शेतमालाचे मूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील संधी याबाबत माहिती घेतली जाणार असल्याचे पुणे विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *