Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Ganesh Chaturthi 2026 : शेफ हर्ष केडिया यांचा विक्रम; भारतातील सर्वात मोठा शुगर-फ्री मोदक साकारला

मुंबईतील सर्वात उंच गणपती ‘साकीनाक्याचा महाराजा’ला अनोखे अर्पण; जगातील सर्वात मोठ्या शुगर-फ्री डेझर्टपैकी एक ठरलेला हा भव्य मोदक गणेशोत्सवाच्या निमित्ताने Cocoa & Katliचे संस्थापक हर्ष केडिया यांनी यंदा मोदकाला विक्रमी स्वरूप दिले आहे.

केडिया आणि त्यांच्या टीमने भारतातील सर्वात मोठा शुगर-फ्री मोदक साकारला असून, या मोदकाचे वजन अंदाजे 350 किलो असून त्याची उंची 4 फुटांहून अधिक आहे. हा भव्य मोदक अंधेरी पूर्व, साकीनाका येथील ‘साकीनाक्याचा महाराजा’ यांना अर्पण करण्यात आला.

साकीनाक्याच्या महाराजांच्या 42 फुटांहून अधिक उंचीच्या गणेशमूर्तीला विशेष नैवेद्य म्हणून हा भव्य मोदक तयार करण्यात आला. 14 सप्टेंबर 2026 रोजी ‘The Tallest Ganesh Idol in Mumbai – 2026’ म्हणून या गणेशमूर्तीची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात भव्य गणेशमूर्ती आणि विक्रमी मोदक हे मंडळाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.

Cocoa & Katliचे संस्थापक हर्ष केडिया म्हणाले, ‘गणेशोत्सव हा मुंबईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि मोदक हा या उत्सवातील तितकाच महत्त्वाचा घटक आहे. या परंपरेचा सन्मान करताना लोकांच्या कायम स्मरणात राहील असा अनुभव निर्माण करण्याची आमची इच्छा होती. एवढ्या मोठ्या आकाराचा मोदक तयार करणे हे निश्चितच एक आव्हान होते; मात्र त्याचबरोबर खाद्यकला, कौशल्य आणि समुदाय यांना एकत्र आणण्याची आणि मुंबईसाठी अत्यंत असलेल्या या उत्सवाचा एक भाग होण्याची ही सुंदर संधी होती.’

हर्ष केडिया यांच्यासाठी हा उपक्रम म्हणजे मुंबईतील एका महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि उत्सवी सोहळ्यात Cocoa & Katliच्या समकालीन भारतीय मिठाईच्या संकल्पनेची झलक सादर करण्याची संधी होती. या मोदकाची शुगर-फ्री वैशिष्ट्यपूर्ण ओळख कायम ठेवत, गणेश चतुर्थीच्या काळात क्वचितच पाहायला मिळेल अशा भव्य आकारात त्याची निर्मिती करण्यात आली. Cocoa & Katliच्या प्रशिक्षित टीमने हा मोदक तयार केला. योग्य अन्नसुरक्षा आणि हाताळणीच्या उपाययोजनांसह हा मोदक मंडपात नेऊन स्थापित करण्यात आला.

गणपतीला अर्पण केल्यानंतर मंडळाच्या परवानगीने हा मोदक आदरपूर्वक भागांमध्ये विभागून भाविकांना प्रसाद म्हणून वितरित करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *