Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Kajol Mother : कजोलच्या आई – वडिलांचे वाद, विभक्त झाले पण घटस्फोट.

अभिनेत्री काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत काजोल हिने इंडस्ट्री नाव मोठं केलं. एक काळ असा देखील होता, जेव्हा काजोल हिच्या आई तनुजा यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

तनुजा यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. तनुजा यांनी त्यांच्या करियरमध्ये एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तनुजा प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचल्या, खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक संकटांचा सामना केला.

सिनेमा आणि अभिनयाव्यतिरिक्त, तनुजा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या. तनुजा यांनी एका चित्रपट निर्मात्याशी लग्न केलेला, पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही, अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण दोघांचा कधीच अधिकृत घटस्फोट झाला नाही. पण तनुजा आणि दिग्दर्शकांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांच्याशी लग्न

तनुजा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर, या 83 वर्षीय अभिनेत्रीचं प्रेम प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांच्यावर जडलं. त्यांची पहिली भेट 1972 मधील ‘एक बार मुस्कुरा दो’ या सिनेमाच्या सेटवर झाली. अखेर मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि वर्षभराच्या रिलेशनशिपनंतर, 1973 मध्ये त्यांनी लग्न केलं.

पतीपासून वेगळ्या, पण कधीच घटस्फोट नाही

लग्नानंतर तनुजा आणि शोमू मुखर्जी यांना दोन मुली झाल्या – मोठी मुलगी काजोल आणि लहान मुलगी तनिषा मुखर्जी. मात्र, लग्नानंतर काही वर्षांतच काजोलच्या पालकांमधील संबंध बिघडले आणि ते वेगळे राहू लागले. असं असूनही, या जोडप्याने कधीच घटस्फोट घेतला नाही. शोमू मुखर्जी यांचे 2008 मध्ये निधन झालं.

जव्हा तनुजा यांनी धर्मेंद्र यांच्या लगावलेली कानशिलात…

तनुजा यांनी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबतही स्क्रीन शेअर केली होती. एकदा एकत्र काम करत असताना तनुजा यांनी धर्मेंद्र यांना कानशिलात लगावली होती. ही घटना 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चांद और सूरज’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानची आहे.

तनुजा यांनी फिल्मफेयरला दिलेल्या मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं होतं की, एका दिवशी शूटिंगच्या वेळी धर्मेंद्र त्यांच्याशी फ्लर्ट करू लागले आणि यामुळे तनुजा अभिनेत्यावर प्रचंड संतापल्या. त्यानंतर त्यांनी धर्मेंद्र यांना ‘निर्लज्ज’ म्हणत कानशिलात लगावलेली. पुढे त्यांनी असंही म्हटलं होतं, ‘मी तुझ्या बायकोला ओळखते. तुझ्या एवढी हिंमत कशी झाली की तू माझ्याशी फ्लर्ट करशील.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *