
अभिनेत्री कतरिना कैफचा हाँगकाँगमध्ये तिचा जन्म झाला. लंडनमध्ये ती लहानाची मोठी झाली. कतरिनाला ६ बहिणी आणि १ भाऊ आहे. तिची लहान बहीण इजाबेल ही सुद्धा मॉडेल, अभिनेत्री आहे. कतरिनाने हिंदी इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
विकी कौशलशी लग्न करुन तिचं वैयक्तिक आयुष्यही सेट झालं. पण कतरिनाची आई सुजैन टरक्वोट या मूळ ब्रिटिश आहेत. त्या लंडनमध्ये आरामाचं आयुष्य जगत असतील असाच अनेकांचा समज असेल. मात्र सुजैन या गेल्या अनेक वर्षांपासून भारतात एका गावात राहून गरीब मुलांची सेवा करत आहे. सुजैन टरक्वोट नक्की काय करतात?
सुजैन टरक्वोट या तमिळनाडूतील मदुराई येथे राहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार त्या २००८ सालीच लंडन सोडून भारतात स्थायिक झाल्या. तमिळनाडूमध्ये त्यांनी एनजीओ सुरु केलं. सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब मुलांना मोफत ट्युशन देत त्यांनी याची सुरुवात केली होती. एका वर्षातच त्यांना विस्तार आणखी वाढला. शिकवणीसोबतच त्यांनी मुलांचं आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षेसंदर्भातही काम सुरु केलं.
२०१५ साली सुजैन यांनी माउंटेन व्ह्यू स्कूलमध्ये शिकवायला सुरुवात केली. ही एक छोटी नर्सरी होती ज्यात फक्त ३० मुलं होती. यापेकी अनेक मुलं मागासलेले आणि गरीब होते. काळानुसार त्यांचा हा प्रोजेक्टही वाढत गेला. आता तिथे ३० नाही तर ३०० मुलं शिकतात. कतरिनानेही अनेकदा आपल्या आईच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. एका मुलाखतीत कतरिना म्हणालेली की तिच्या आईने आलिशान आयुष्यापासून दूर वेगळं आयुष्य जगत आहे. तिथे राहणं खरं तर सोपं नाहीये. त्यांच्याकडे विजेचीही सोय नाहीये. फक्त १२ तासच वीज असते. मला अनेकदा तिला व्हिडीओ कॉलही करता येत नाही कारण इंटरनेटचीही सुविधा नसते. आम्ही नॉर्मल कॉलवरच बोलतो. गरीबांची सेवा करणं हे माझ्या आईमध्ये लहानपणापासूनच होतं असंही ती म्हणाली.



